चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटची चर्चा! चाहते भाऊक….

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आयपीएल 2024 मधील आज घरच्या मैदानावर हंगामातील शेवटचा सामना खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत (RR) होणार आहे.या सामन्यापूर्वी चेन्नईने चाहत्यांना सामन्यानंतर मैदानावर थांबण्याची खास विनंती केली आहे, ज्याचा संबंध चाहते एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्तीशी जोडत आहेत.

चेन्नईच्या या घोषणेनंतर अनेक चाहते भावूकही झाल्याचे पाहायला मिळत आहे.चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईचा राजस्थान विरुद्ध सामना होणार आहे. चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर चेन्नईचा हा शेवटचा सामना असेल. सामन्यापूर्वी, चेन्नईने सोशल मीडियावर कॅप्शनसह एक पोस्ट जारी केली, “सुपर चाहत्यांना खेळानंतर येथे थांबण्याची विनंती आहे!” पुढे लिहिले होते, “तुमच्यासाठी काही खास येत आहे.” याशिवाय पोस्टरमध्ये चाहत्यांना सामना संपल्यानंतर थांबण्याची विनंतीही करण्यात आली होती.

चेन्नईने ही पोस्ट शेअर करताच लोकांनी याला टीमचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्तीशी जोडण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “आज मी नक्कीच रडणार आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “हे आणखी भयानक आहे.” एका युजर्सने धोनीचे काही फोटो शेअर करत लिहिले, “याबद्दल धन्यवाद.” आणखी एका युजर्सने विचारले की, “हा धोनीचा शेवटचा सामना असेल का?”