CBSE Class 12 result: सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं CBSE ने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेंटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे.यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली पास झाल्या असून, मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

कुठे पाहता येईल निकाल?

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसंच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.

कसा पाहता येईल निकाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, स्कूल नंबर आणि Admit Card ID ची गरज भासेल. निकाल पाहण्यासाठी

-स्टेप-1 – सर्वात आधी वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर .

स्टेप-2 – यानंतर होम पेजवर जाऊन 12th Result या पर्यायावर .

स्टेप-3 – त्यानंतर लॉगइन डीटेस्ल एंटर करुन पुढे प्रवेश करा.

स्टेप-4 – यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. या निकालाची प्रिंट आऊट नक्की घ्या.

यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईने यावर्षी देखील मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाही. अनहेल्दी कॉम्पीटिशन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.