मोदींच्या इश्याराने पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला !

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर केंद्र सरकारने गंभीर पावले उचलत पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी बिहारमध्ये झालेल्या सभेत पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या भांडवली बाजारात मोठी उलथापालथ झाली.

भारताने पाकिस्तानविरोधात दिलेल्या जोरदार राजनैतिक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या भांडवली बाजारात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. कराची शेअर बाजाराचा निर्देशांक कराची 100 तब्बल अडीच हजारांनी गडगडला आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहलगाल हल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर पाच मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत. भारताकडून पहिल्यांदाच 1960 साली करण्यात आलेला सिंधू नदी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्याचे पडसाद पाकिस्तानच्या भांडवली बाजारात उमटले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतला आहे. बुधवारी देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा विकास दर म्हणजे जीडीपी वाढीचा अंदाज 2.% पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भांडवली बाजारात विपरीत परिणाम दिसून आला. सोबतच, पाकिस्तानी रुपयाची पडझड, राजकीय अस्थिरता आणि पाकव्याप्त काश्मीरातील असुरक्षितता या सर्वांचा परिणाम गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

पहलगाम काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है… अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.

बिहारच्या भूमीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या आकांना शोधून काढेल, कठोरातील कठोर शिक्षा देईल. ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढू. भारताचं स्पीरिट, भारताचं धैर्य दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे खचणार नाही,दहशतवाला कदापि माफी मिळणार नाही. या प्रकरणात योग्य न्याय होईलच, यासाठी सर्व ते प्रयत्न करु. हाच निर्धार प्रत्येक भारतीयाचा आहे. माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील प्रत्येक देश आणि त्यांच्या नेत्यांचे आभार, असेही मोदींनी म्हटले.