सांगोल्यासह चार तालुक्याचा उद्या पाण्यासाठी मोर्चा…..

लोकसभा निवडणूक संपताच नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आल्याने पंढरपूरसह सांगोला माळशिरस फलटण येथील शेतकरी संतप्त झाले. दरम्यान शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता कालव्याच्या दुरुस्तीसाठी व कालव्याला घळ पडल्याने पाणी बंद करण्यात आल्याचे निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्या कडून
प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले.

माढा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच नीरा कालव्यातील पाणी बंद केल्याने पंढरपूर, माळशिरस, सांगोला फलटण या तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या मुद्यावरून भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नीरा कालवा लाभधारक शेतकऱ्यांची शिवरत्न बंगला येथे बैठक बोलावून सोमवारी सकाळी दहा वाजता फलटणच्या नीरा उजवा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला. यावेळी मोठ्या संख्येने या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागीव्हावे असे आवाहन रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शेतकऱ्यांना केले.