शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १३६ गावांना फटका बसणार आहे.
राज्य रस्ते विकास प्रधिकरणाने पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळे प्रारूप आराखडे (अलाईनमेंट) तयार केले आहेत. पर्यावरण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने सादर केलेल्या ४८ पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे.
पहिल्यात टप्प्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यांतील ५५ गावे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १८ गावे, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतील ६१ गावे, तसेच उर्वरित धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या टप्प्यात येत असला, तरी तुळजापूर तालुक्यातील दोन गावे पहिल्या टप्यात येत आहेत. पहिल्यासाठी तीन वेगवेगळ्या अलाइनमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १३६ गावे बाधित होणार असून १३४ गावे पश्चिम महाराष्ट्रातील, तर दोन गावे मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बाधित गावे
बार्शी तालुका- गौडगाव, रातजंन, मालेगाव, अंबाबाईचीवाडी, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपण, शेळगाव (आर.) उत्तर सोलापूर- कौठाळी, कळमण, पडसाळी, मोहोळ तालुका- मसलेचौधरी, खुनेश्वर, भोयरे, हिंगणी (निपाणी) मोहोळ, पोखरापूर, आढेगाव, सौंदणे, टाकळी सिकंदर, पंढरपूर तालुका- पुळुज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी, आंबे, अनावळी, सातेफळ, खर्डी, सांगोला तालुका – मतेवाडी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, चिंचोळी, बामणी, एखतपूर, सांगोला, कमलापूर, अजनाळे, चिनके, वझरे, बाळेवाडी, नाझरेवाडी, चोपडे आदी.