रब्बी हंगाम टेंभू व म्हैशाळ योजनेतून पूर्ण क्षमतेने आवर्तन पूर्ण होणार-शहाजीबापु पाटील

कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेल टू हेड पाणी मिळण्यासाठी नियोजन करावे अश्या सूचना केल्या त्याचबरोबर आवर्तन चालू असताना आवर्तन यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्याने त्या ठिकाणी उपस्थित राहावे.

अशाही सूचना करण्यात आल्या यावेळी अधिकाऱ्याकडून रब्बी हंगामाचे म्हैशाळ योजनेचे पंप १७ नोव्हेंबर रोजी चालू होतील व टेंभू योजनेची रब्बी हंगामाचे पंप १५ डिसेंबर रोजी चालू होतील टेंभू चे पाणी १५ जानेवारी पर्यंत सांगोला तालुक्यामध्ये पोहोचेल या पाण्यामधून दोन्ही योजनांची रब्बी हंगाम आवर्तन यशस्वी केले जाईल.

यावेळी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी खासदार संजय काका पाटील, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रशांत परिचारक, यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.