या तारखेला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणारभारतीय हवामान खात्याने देशभरातील शेतकऱ्यांना नुकतीच एक आनंदाची वार्ता दिली आहे. हवामान खात्याने मान्सून आगमनाची तारीख जाहीर केली आहे. हवामान खात्याने यावर्षी अंदमानात मान्सूनचे 19 मे च्या सुमारास आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच केरळमध्ये यंदा 31 मे च्या आसपास मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले जात आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या या तारखेत मात्र तीन-चार दिवस मागेपुढे होऊ शकतात. 28 मे ते तीन जून या कालावधीत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील यंदा वेळेवर मान्सून आगमनाची शक्यता व्यक्त होत आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या दहा दिवसांपासून वादळी पावसाचे सत्र सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा नैसर्गिक संकटांच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस वादळी पावसाचे हे सावट महाराष्ट्रावर कायम राहण्याची शक्यता आहे.
अशातच आता महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी अर्थातच 23 मे ला बंगालच्या उपसागरात एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.हे चक्रीवादळ अतिशय तीव्र स्वरूपाचे राहणार असून याचा फटका महाराष्ट्राला देखील बसणार आहे.
हे तीव्र चक्रीवादळ 23 मे ते 26 मे या कालावधीत ओडिशा, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना प्रभावित करू शकते असा अंदाज आहे.चक्रीवादळामुळे या सदर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषता गुजरात आणि मुंबईमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहू शकते असा अंदाज आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जोर धरत असलेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकणार आहे. याचा परिणाम देशाच्या विस्तृत भागात पाहायला मिळू शकतो.पण, भारतीय हवामानशास्त्र विभागाने अद्याप या चक्रीवादळाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
यामुळे हवामान विभाग चक्रीवादळाबाबत काय माहिती देते याकडे विशेष लक्ष लागून आहे.तथापि या चक्रीवादळाबाबत अजून IMD कडून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाहीये. यामुळे याचा प्रभाव नेमका कसा राहील ? बंगालच्या उपसागरात खरंच चक्रीवादळाची निर्मिती होणार का हे आताच सांगता येणे कठीण आहे.