आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय!

सरकारने आता शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसूम योजना आणण्याचे ठरवले आहे त्यासाठी कच्च्या मसुद्यावर सरकार काम करत आहे. या योजनेत आता शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हाताळता यावा यासाठी सरकार काम करत आहे.सरकारच्या पोर्टलमार्फत पंप व्यापारी यांच्याशी शेतकरी थेट संपर्क करू शकतात.

यापूर्वी सरकारने सोलार टॉप योजना आणली होती ज्या मध्ये घराघरात सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. याच योजनेत आता सरकार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप प्रकल्पाचा आधार मिळावा यासाठी सरकारने ही नवी योजना आखली आहे.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात सौरऊर्जा पंप निवडीपासून व त्यांच्या वापरापर्यंत मदत या प्रकल्पामार्फत करण्यात येणार आहे.

सध्या यांची चाचपणी प्राथमिक पातळीवर सुरू असल्याने सगळ्या गोष्टी नियोजनात आहे त्यामुळे याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.यामध्ये सौर ऊर्जा पंप खरेदी विक्रीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.आपली नोंदणी करुन आपल्याला हवा तसा पंप व आपली गरज ओळखून डीलरला ही ऑर्डर शेतकऱ्यांना देता येणार आहे.

या योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के सबसिडी व राज्यांकडून ३० टक्के सबसिडी मिळू शकते.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि कृषी क्षेत्रात सिंचन आणि डिझेलीकरणाचे स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कुसुम योजना सुरू करण्यात आली. ही योजना केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केली होती.

हे अद्याप प्राथमिक अवस्थेत असून त्यावर चर्चा सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने वृत्तात नमूद केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीएम कुसुम योजनेच्या काही भागांमध्ये काही सुधारणांची गरज आहे. निविदा काढण्याशी संबंधित विलंबामुळे योजना अनेक मार्गांनी अडकून पडली आहे.