आयपीएल 2024 (IPL 2024) आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आमने सामने येणार आहेत.बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे.
आरसीबी आणि चेन्नई प्लेऑफच्या (Playoffs) उंबरठ्यावर आहेत. चेन्नईकडे 13 मॅचमध्ये 14 गुण आहेत. तर आरसीबीकडे 12 गुण आहेत. चेन्नईनं विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर, दुसरीकडे आरसीबीला मोठ्या फरकानं चेन्नईवर विजय मिळवत चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्रवेश मिळू शकतो.
आरसीबीला चेन्नईवर 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 18.1 एक ओव्हरपूर्वी जी धावसंख्या असेल ती पूर्ण करावी लागेल.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत.
चेन्नईनं 21 वेळा विजय मिळवला तर 10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे. एका मॅचचा निकाल लागू शकला नाही.आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर आणि मोबाईल आणि टॅबलेडवर जिओ सिनेमावर पाहता येईल.
