भांडुपमध्ये ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते ताब्यात….

मुंबईच्या   भांडुपमध्ये  ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डमी मशिनचं प्रात्याक्षिक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतांनी पोलिसांना झापलं आहे.   

सुनील राऊत म्हणाले, आमची भूमिका ठाम आहे. ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवले आहे संजय दिना पाटलांना दिल्लीला पाठवणार आहे.भारतीय जनता पक्ष आम्हाला प्रचंड त्रास आहे. कालपासून जास्त त्रास देत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले जात आहे. आमच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना धमकी दिली आहे. आज सकाळी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.  

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. डमी मशीनवर कार्यकर्त्यंकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.   त्यानंतर संजय राऊतांनी या संदर्भात पोलिसांना जाब विचारला आहे.