Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! १ मार्चला मोठा होणार निर्णय, २१०० रुपये देणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु होणार आहे. या योजनेत महिलांना सध्या दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.या योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. लाडकी बहीण योजनेत आता २१०० रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत महिलांना राज्याच्या अर्थसंकल्पानंतर २१०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक नेत्यांनी वक्तव्य केली आहेत. दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प १ मार्चला सादर करतात. दरम्यान, १ मार्चच्या अर्थसंकल्पात हा महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याचे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिला २१०० रुपयांच्या प्रतिक्षेत होत्या. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आता सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे.एकीकडे महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना २१०० रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने अद्याप २१०० रुपयांबाबत कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची अंबलबजावणी होण्यासाठी किमान तीन-चार महिने तयारी करावी लागते. त्यामुळे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.