हातकणंगले येथे सातत्याने अपघात घडत असल्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर रात्री सदाशिव वडर उशिरा झालेल्या अपघातात माणगाव येथील सदाशिव व्यंकप्पा वडर (वय ५२) हे जागीच ठार झाले तर सदाशिव परशराम कोरवी (४८) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गावर माणगाव येथील सदाशिव वडर व सदाशिव कोरवी विहीर खोदाईचे काम करतात.
हातकणंगले येथील काम आटोपून मोटारसायकल (एमएच ०९ बीटी ९१०६) वरून माणगावकडे परतत असताना मोटरसायकलला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यात मागे बसलेले सदाशिव वडर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले. त्याचवेळी कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने निघालेले वाहन अंगावरून गेल्याने वडर यांचा जागीच मृत्यू झाला.