इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या खुनाच्या तयारीत असणाऱ्या संशयितांना अटक!

कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील पाच संशयितांच्या टोळीला धरपकड करून कराडमध्ये जेरबंद केले. ही टोळी इचलकरंजी जि.कोल्हापूर येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा कटासाठी पैसे जमविण्याच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी संशयतांकडून दोन दुचाकीसह तीन देशी बनावटीची पिस्तुले व घातक हत्यारे असा एकून तीन लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.

सातारा येथील पोलीस मुख्यालयात सदर पाच संशयितांना अटक; तीन गावठी कट्ट्यासह शस्त्रे जप्त कारवाईबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बबलु उर्फ विजय संजय जावीर (वय ३२, रा. शहापुर ता. हातकणंगले)अटक केलेल्या पाच जणांच्या टोळीने इचलकरंजी येथील एका माजी नगरसेवकाची हत्या करण्याचा कट रचला होता. या नगरसेवकाचे सार्वजनिक गणेश मंडळ आहे. तर आरोपींमधील बबलू उर्फ विजय जावीर हाही इचलकरंजी येथील दुसऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा सदस्य आहे. जावीर याचा पूर्वी अवैध पायरेटेड सीडी तयार करण्याचा व्यवसाय होता. त्याची टिप माजी नगरसेवकाच्या मंडळातील एकाने पोलिसांना दिल्याने जावीर याच्यावर कारवाई झाली होती.

त्याच्या रागातून जावीर आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी मंडळातील एकाची हत्या केली होती. या गुन्ह्यात जावीर हा बारा वर्षे कारागृहात होता. दरम्यान, हत्या झालेल्या मंडळाच्या संबंधित काहीजणांनी मिळून जावीर याच्या मंडळाशी संबंधित एक केली. कारागृहात असताना जावीरने निकेत पाटणकर, सुरज बुधावले अशा काहीजणांची टोळी जमवली. या टोळीच्या माध्यमातून पैसे उभा करून प्रतिस्पर्धी मंडळातील माजी नगरसेवकाची हत्या घडवून आणण्याचा कट जावीरने रचला होता. त्यासाठी पैसे उभा करण्यासाठी ही टोळी कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती.