इचलकरंजीचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याची उपमुख्यमंत्र्यांची इचलकरंजीकरांना ग्वाही!

इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न खूपच गाजलेला आहे पिण्यासाठी नागरिकांची खूपच हेळसांड पाहायला मिळते. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिलेली आहे. वस्त्र नगरीतील बंधू भगिनींनी काळजी करू नये तुम्हाला पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी महायुती सरकारच देणार आहे यासाठी आमचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.त्यामुळे तुमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणाने सोडवू याचबरोबर यंत्रमागाच्या वीज बिलासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन तो ही प्रश्न निकालात काढू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे.

यावेळी ते इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पाणी मिळण्यासाठी जातीने लक्ष घालण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच केंद्र सरकारच्या तीन कोटी घरकुलाच्या योजनेतून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आय जी एम हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आभावी रुग्णांवर उपचार करणे कठीण झाले असल्याचे निदर्शनास आल्याने आयजीएममध्ये नोकर भरती करण्याचे त्यांनी आदेश असल्याचेही सांगितले.