अलीकडच्या काळात अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अनेक गावात जलजीवन योजना देखील राबवल्या आहेत. वाळवा तालुक्यातील इटकरे गावाला बारा वर्षांपूर्वी मंजूर झालेली होती. इटकरे (ता. वाळवा) येथील अल्पकाळात पूर्ण केलेली जलजीवन नळ योजना व जुन्या पेयजल योजनेतील त्रुटी दूर करून गावास शुद्ध व उच्च दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला. येथील महिलांनी एकत्र येऊन योजनेसाठी परिश्रम घेणारे सरपंच, ग्रामसेवक, कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. बारा वर्षांपूर्वी मंजूर झालेली पेयजल पूर्ण क्षमतेने या महिन्यात सुरू झाली.
शिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन योजनेचे काम वेळेत पूर्ण केले. या दोन्ही योजनेमुळे वारणा नदीवरून पाणी मिळते. ते शुद्ध करून नव्या पाईपलाईनद्वारे सर्व प्रभागांमध्ये उच्च दाबाने वितरित होत आहे. सरपंच संपत कांबळे, ग्रामसेवक धनाजी गुरव, कर्मचारी यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. गावातील शंभरभर महिलांनी कार्यालयात जाऊन सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. बचत गटाच्या प्रवर्तक सुजाता पवार, सुनंदा माने, अश्विनी पाटील, शोभाताई पाटील, माधुरी गजरे, स्वाती गजरे, सविता गुरव उपस्थित होते.