लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय….

सत्ताधारी भाजपप्रणित महायुती आणि विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून आपल्याशी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क सुरू आहे. दोघांनीही त्यांच्याबरोबर येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे मात्र मी कोणाहीबरोबर जाणार नाही. मला त्यांच्यात रस नाही, मी स्वतंत्र लढणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.

वाळवा तालुक्यातील शेतकरी (Farmer) व कार्यकर्त्याची भेट त्यांनी घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणार निवडणूक आणि तयारीच्या पार्श्वभूमीवर शेट्टी म्हणाले, माझी निवडणूक अथवा उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व ग्रामीण भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आहे. मला राजकारणात करिअर करायचे नव्हते किंवा यापुढेही करायचे नाही.

मला जे करायचे होते, ते करून झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती आणि मी त्यावर आधीपासून ठाम आहे.मला राजकारण करायचे नाही. मी सर्वसामान्य घटक, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे.