मंगळवेढा शहरात व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून एसबीआय या बँकेच्या नावाने व्हाट्सअप वर बनावट लिंक पाठवून मोबाईल हॅक करण्याचे प्रकार घडत आहेत.जे व्यक्ती या लिंक करतील वर अथवा एपीके फाईल डाऊनलोड करतील अशा लोकांचे बँक खात्यातील रक्कम पळवली जात आहे.
तसेच व्हाट्सअप व मोबाईल हॅक करून ग्रुप वर बनावट मेसेज पाठवले जात आहेत.सर्व नागरिकांनी अशा कोणत्याच बनावट लिंक वरती क्लिक करू नये अथवा एपीके फाईल डाऊनलोड करू नये अन्यथा आपल्या नुकसानीस स्वतः जबाबदार असाल त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे बंदी आहे.कुडुवाडी शहरातील अनेक व्यापारी वर्गाच्या बँक खात्यातील रक्कम एका लिंकमुळे उडाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने ग्रुप वर अथवा पर्सनल व्हॉट्सअॅप लिंक येत होती.सदर लिंकवर क्लिक करताच व्हॉट्सअॅप नंबर हॅक केला जात होता. त्यानंतर थोड्याच वेळात स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध बँकेतील सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून काढून घेतली जात होती.
सोमवार, दि.२७ मे रोजी रात्री ८ वाजल्या पासून ते दि.२८ मे दरम्यान हा प्रकार घडला.याबाबत जयेश अशोककुमार बजानिया यांनी लेखी तक्रार कुर्दुवाडी पोलिसात दिली आहे. यात त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह विविध बँकेतील सुमारे दोन लाखाची रोकड गायब झाल्याचे म्हटले आहे.असाच प्रकार अनेकांबाबत घडल्याची चर्चा सुरु होती. मंदार शहा यांनी ही त्यांच्या मोबाईलचे व्हॉटस्अॅप हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तर अनेकांनी सायबर ब्राँचकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.