सांगोल्यात मान्यवरांचा गौरव पुरस्काराने सन्मान !

सांगोला तालुका हा प्रत्येकाच्याच ओळखीचा आहे.अनेक कार्यक्रम सांगोल्यांमध्ये अगदी उत्साहाने साजरे केले जातात.नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या हेतूने माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापना केली.

पारदर्शकता, विश्वासाहर्ता, ग्राहकाभिमुखता या मूल्याचे पालन करून अल्पावधीतच संस्थेने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी सांगोला यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व माणगंगा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

२६ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता एमबीएम मॉल, सांगोला येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. डॉ.डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमास तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले यांनी केले आहे.