कबनूर मध्ये नळ कनेक्शन कामाचा शुभारंभ!

कबनूर येथील संभाजीनगर मधील ग्रामस्थांना गावात जलजीवन अंतर्गत सुरु असलेल्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेमधून पाणी पुरवठा जलवाहिनी टाकतानाच मोफत नळ कनेक्शन देणे कामाचा शुभारंभ माजी जि.प.सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते झाला. तसेच पूर्वी काही भागात खुदाई करुन केवळ जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत अशा नळधारकांना देखील लवकरच मोफत नळ कनेक्शन जोडून देण्यात येणार आहे. शासनाच्या जलजीवन योजने अंतर्गत गावाला मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी जलवाहिन्या टाकताना.

नळधारकांना नळ कनेक्शन जोडून देण्यात येत नव्हते. त्यामुळे नळधारक व संबंधित मक्तेदार यांच्यात वाद होऊन काम थांबले होते. जलवाहिन्या टाकताना नळ कनेक्शन जोडून देण्याचे काम अंदाजपत्रकात नमूद नसल्याने मक्तेदाराने ते केले नाही.दरम्यान, नळधारकाना मोफत नळ कनेक्शन देण्यासाठी नवीनवाढीव प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यास अद्याप मंजूरी न मिळालेने सर्व कामकाज ठप्प होते. ही गोष्ट ओळखून आम. प्रकाश आवाडे व माजी जि.प. सदस्य राहूल आवाडे यांनी स्वखर्चातून कबनूरमधील नळधारकांना मोफत नळ कनेक्शन जोडून देण्याचे काम सुरुवात केली.