Mr And Mrs Mahi : गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. क्रिकेट आणि रोमान्स असलेल्या या चित्रपटाला ‘सिनेमा लव्हर्स डे’चा खूप फायदा झाला. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहायला सिनेमागृहात गेले. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या या चित्रपटाने ओपनिंग डेला 6.8 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही ‘मिस्टर अॅन्ड मिसेज माही’ बॉक्स ऑफिसचं मैदान गाजवताना दिसून आला.