सांगलीत बनावट नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश…

सांगली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकत, सांगली पोलिसांनी 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जुन्या पद्धतीच्या  50 रुपयांच्या बनावट नोटा बनवल्या जात होत्या. यावेळी पोलिसांनी मशिनरीसहीत 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  

सांगलीतील मिरजमध्ये बनावट नोटा बनवणार्‍या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकास अटक केली आहे. अहद महंमद अली शेख असे त्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली होती.