राष्ट्रवादीच्या ‘या’ कॅप्टन समोर कोणाचं चालत नाही…

लोकसभा निवडणुकीच्या निकालात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले आहेत. पक्ष फुटलेला असताना, हातात कोणतीच रस नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दाखवून दिले आहे की आपण मुठभर असलो तरी लाखांना भारी पडू शकतो.

काल जाहीर झालेल्या निकालात 10 पैकी 8 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाने स्वतःचा स्ट्राईक रेट प्रचंड उंचीवर नेऊन ठेवला आहे. याआधी स्व. आर आर पाटील हे प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या होत्या मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने तब्बल 18 जागा लढवल्या होत्या. पण यंदा राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या त्यातील 8 जागा जिंकून 80% स्ट्राईक रेट गाठला आहे.

या विजयामुळे खरी राष्ट्रवादी कोणती आणि लोकांच्या मनात कुणासाठी स्थान आहे हे तर स्पष्ट झालेच पण ज्या जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्न निर्माण करण्यात आले होते, ज्या जयंत पाटील यांच्याबाबत वावड्या उठवल्या जात होत्या. पण या सर्व गोष्टींवर मात करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कॅप्टनशीपवर निर्वादितपणे शिक्कामोर्तब झाला आहे.