इस्लामपूर येथे आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने इस्लामपूर (Islampur) कापुसखेड नाका येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रात राजारामबापू शिक्षण व उद्योग समुहातील ५ हजार कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व प्राध्यापकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमत प्रतिक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या आरोग्य शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, कृष्णेचे शिल्पकार स्व. जयवंतराव भोसले, श्रीमती कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शामराव पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, पुष्पलता खरात, डॉ. नरसिंह देशमुख, डॉ. एन. टी. घट्टे, संदीप पाटील, आयबीएफचे विकास राजमाने, विश्वजीत पवार, कृष्णा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी विशाल मोहिते, आबीद मोमीन, देवराज देशमुख, दिग्विजय पाटील, प्राचार्य एन. आर. मुजावर, अनुप करांडे, इलियास पिरजादे, साजिद रोटीवाला यांच्यासह समूहातील मान्यवर उपस्थित होते.