इस्लामपूर, निसर्गाचा(nature) समतोल ढासळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान पाच झाडे लावून त्यांची जोपासना करायला हवी, अशी भावना चे राजारामबापू पाटील सहकारी साखरकारखान्याचे अध्यक्ष, प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शहर महिला राष्ट्रवादीच्या ‘सुंदर माझी परसबाग’ या उपक्रमाचे कौतुक केले.
इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सुंदर माझी परसबाग’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. शामराव पाटील, राजारामबापू सह. बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, प्रदेश सदस्या कमल पाटील, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, रोझा किणीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सौ. संगीता जगताप यांचे आनंदी विचार या विषयावर व्याख्यान झाले.
शहाजीबापू पाटील म्हणाले, आम. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेने शहरात दोन लाख झाडे लावली आहेत. आम. पाटील यांनी विविध माध्यमातून निधी उभा करून शहरात ३ सुंदर बागा उभ्या केल्या आहेत. यावेळी सुस्मिता जाधव, श्रध्दा कुलकर्णी, प्रितम माळी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पुष्पलता खरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
स्पर्धेत मयुरी पाटील यांनी प्रथम क्रमांक, प्रितम माळी यांनी द्वितीय क्रमांक, विजया गुणवंत यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या मान्यवरांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सुभाष सुर्यवंशी, शंकरराव चव्हाण, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, प्रतिभा पाटील, मनिषा पेठकर, प्रियांका साळुंखे, संगीता जगताप, संगीता शहा, अॅड. विद्या पाटील, चारुशीला फल्ले, मधू देसावळे आदी उपस्थित होते. उषा मोरे यांनी सुत्रसंचलन केले. शैलेजा जाधव यांनी आभार मानले.
