इस्लामपुरात गटारीच्या कामाने रस्ता बंद! गटारीचे काम लवकरच पूर्ण करण्याची नागरिकांमधून मागणी

पालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे इस्लामपूर शहरातील शाहूनगर मधील होत असलेल्या गटारीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील मार्गस्थ असणारा रस्ता बंद झालेला आहे. दरम्यान बांधकाम विभागाचे प्रमुख रमेश पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

इस्लामपूर शहरातील काही भागात गटारीचे काम हे अर्धवटच राहिलेले आहे. विशेषतः इस्लामपूर ताकारी रस्त्यालगत असणाऱ्या शाहूनगर परिसरातील एका गल्लीतील गटारीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले आहे त्यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून ये जा करता येत नाही. पालिकेकडे तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही गटारीचे काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे.