गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य-चेतनसिंह केदार- सावंत

गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे. भ्रष्टाचारमुक्त गरीब कल्याणाच्या योजना आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवणे हेच मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्याचा फायदा जनतेला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षात गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळखपत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली आहे.

मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला गॅस, ८० कोटी लाभार्थीना मोफत रेशन, किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, जल जीवन मिशन अशा विविध योजना राबवल्या आहेत. देशहितासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम उभे राहिले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षांमध्ये गोरगरिबांच्या कल्याणासाठी कामे झाली आहेत. सामान्य माणसाला आपलेसे वाटणारे नेतृत्व मोदींचे आहे.

देशाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ९ वर्षाची कारकीर्द गरजू, गोरगरीब, समाजातील शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासह स्वतःच्या पायावर गरिबांनीही उभे राहावे यासाठी अनेक योजना केंद्र सरकार राबवित असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. यावेळी डॉ. ग. भी. मिसाळ, डॉ. अनिल कांबळे, नवनाथ पवार, डॉ. विजय बाबर, वसंत सुपेकर, आनंद फाटे, बिरा | मेटकरी, लक्ष्मीकांत लिगाडे, शीतल लादे, वैजयंती देशपांडे, राजू शिंदे, किरण चव्हाण, सौरभ देशपांडे, गंपू काटकर, श्रीकांत बाबर, संगीता चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.