मातोश्री गिरीजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विदयालय सांगोला येथे जागतिक सुरक्षा सप्ताह दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन सदर कार्यक्रमास सांगोला शहरामध्ये शालेय बस वाहतुक करणाऱ्या २९ वाहन चालकांचा फेटा, पुष्प, सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सांगोला पोलिस स्टेशनचे वाहतुक विभागाचे प्रमुख श्री. बोधगिरे पी.एन.व श्री. घुले एन. एम. यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सांगोला शहारामध्ये सुरक्षितपणे विदयार्थी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहन चालकांना एकत्रित करून त्यांना वाहतुकीचे नियम तसेच शिस्त याबददल सविस्तरपणे श्री. बोधगिरे साहेब यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापक श्री. खतीब एस.एच. हे होते. सदर कार्यक्रम हा सर्व वाहन चालकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व विदयार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात वाहन चालकांची भुमिका किती महत्वाची झाली आहे.
हे त्यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. सन्मानाला उत्तर देताना वहान चालकांनीही संस्थेच्या या उपक्रमाबददल आभार व्यक्त केले व आमचा सन्मान केला याबददल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी बी.एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. गरंडे एस.के. प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिंदे मॅडम बी.एड. व डी.एड. विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होता.