फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधील एडीएमएलटी विद्यार्थ्यांची सांगोला येतील अर्हत पॅथॉलॉजी व डॉ. बोराडे डायग्नोस्टिक लॅबला भेट देण्यात आली. यावेळी अर्हत पॅथॉलॉजी डॉ. क्षितीज चंदनशिवे व डॉ. प्रमोद बोराडे यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी डॉ. क्षितिज चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या विभागांची माहिती दिली. यामध्ये सॅम्पल कलेक्शन टेस्टिंग व रिपोर्टिंग याबद्दलची सविस्तर माहिती विद्याथ्र्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे यावेळी डॉ क्षितीज चंदनशिवे व डॉ. प्रमोद बोराडे (डॉ. बोराडे डायग्नोस्टिक सेंटर) यांनी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन दूर केले. तसेच या ठिकाणी लॅबला आवश्यक असणारी साधने व उपकरणे ती कशा प्रकारे हाताळावीत याबद्दलची माहिती देण्यात आली.
तसेच संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश, रूपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पॅथॉलॉजी भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या पूर्व परवानगीने विभाग प्रमुख प्रा सुरज कांबळे, प्रा. नंदिनी सुरुशे यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली.