सोलापूर शहर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाने सलग चौथ्या दिवशी सर्वदूर दमदार हजेरी लावली. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सोलापूरच्या सकल भागात पाणी साचले. ग्रामीण भागातील ओढे, नाले वाहत होते. शेतांना तळ्याचे स्वरूप आले. शहरातील जय मल्हारनगरातील झोपडपट्टी मध् पावसाचे पाणी शिरले.
रविवारी सायंकाळी पाच वाजता पावसाने गर्जनेसह जोरदार हजेरी लावली. दुपारी चार नंतर पूर्वेकडून दर भरून आले. त्यानंतर जोरदार सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत पडलेल्या दराने शेतामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोलापूरसह उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माढा, बार्शी या तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
पंढरपुरात तालुक्यातील सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र पाणी साचून राहिलेले आहे. गावोगावच्या अनेक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या होत्या त्या पुन्हा कार्यान्वित होण्याचे चित्र दिसून येत आहे.