इचलकरंजीत डासांचा वाढला उपद्रव! नागरिकांतून नाराजीचा सूर….

सध्या मान्सूनची जोरदार हजेरी राज्यातील अनेक भागांमध्ये लागलेली आहे. मान्सूनची सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू दिसत आहे. अशातच शेतामधील पेरणीला सुरुवात देखील शेतकऱ्यांनी करायला चालू केलेली आहे. इचलकरंजीत देखील मान्सूनचा शिडकाव सुरू झालेला आहे.

अशातच शहरातील गटारी तुंबल्यामुळे अनेक भागात गटारीतील पाणी रस्त्यावर उभे राहिलेले चित्र पाहायला मिळत आहेत. इचलकरंजी शहर परिसरातील लहान-मोठ्या गल्ल्यांमध्ये असलेल्या सारण गटारींची स्वच्छता ही वेळोवेळी होत नसल्यामुळे डासांच्या संख्येत खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

यामुळे या डासांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या गटारीच्या बाबतीत महापालिकाच्या वतीने तातडीने स्वच्छता करण्याबरोबरच धूर व औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.