इचलकरंजीत सवलतीच्या पास योजनेची सुविधा उपलब्ध….

दरवर्षी विद्यार्थी- विद्यार्थीनींसाठी महाराष्ट्र महामंडळाच्या आगाराच्या वतीने सवलतीच्या दरात पास योजना राबविली जाते. त्यामध्ये इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवास पास दिला जातो. यासाठी इचलकरंजी आगार क्षेत्रातील इचलकरंजी, वडगांव व हातकणंगले या तिन्ही ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत पास दिले जातील. तर इचलकरंजीतील राजवाडा राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत पास दिले जातील.

इचलकरंजी शहर व परिसर तसेच वडगांव, हातकणंगले भागातील शाळा या महाविद्यालयांनी मागणी केल्यास आगाराच्या वतीने शाळा, महाविद्यालयातच स्वतंत्र कॅम्प घेऊन पासची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ विद्यार्थी-विद्यार्थी, पालक तसेच शाळा व महाविद्यालयांनी घ्यावा. असे आवाहन आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.