Bigg Boss 18 : पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर….

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सलमान खानच्या या शोचा वेगळा चाहता वर्ग आहे. बिग बॉस प्रेमी वर्षभर नव्या सीझनची वाट पाहत असतात. बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून जाण्याचीही अनेक सेलिब्रिटींची इच्छा असते, तर काही सेलिब्रिटी ही ऑफर नाकारतात. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर मिळाल्याची माहिती आहे.क्ष्मण बिश्त उर्फ ​​’लकी बिश्त’ यांना बिग बॉस शोची ऑफर आली होती.

लकी बिश्त यांनी याआधी पंतप्रधान मोदी यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम केलं आहे. लकी बिश्त पंतप्रधान मोदी यांचे माजी सुरक्षा रक्षक असण्यासोबतच माजी रॉ एजंट आणि एनएसजी कमांडो आहेत. लकी बिश्त यांनी सांगितलं की, त्यांना बिग बॉस शोमध्ये जाण्यासाठी ऑफर मिळाली होती.पंतप्रधान मोदींचे माजी पर्सनल सिक्युरिटी गार्ड, माजी RAW एजंट आणि NSG कमांडो लक्ष्मण बिश्त उर्फ ​​लकी बिश्त यांनी सांगितलं की, बिग बॉस शोच्या निर्मात्यांनी त्यांना संपर्क केला होता आणि शोची ऑफर दिली होती.

लकी बिश्त यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की, बिग बॉस 18 येणार होता, त्यापूर्वी त्यांना या शोसाठी ऑफर मिळाली होती, मात्र त्यांनी बिग बॉस शोची ऑफर नाकारली.पंतप्रधान मोदी यांचा माजी सुरक्षा कर्मचारी लकी बिश्त हे स्निपर आणि रॉ एजंट होते. लकी बिश्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. शोच्या निर्मात्यांनी शोमध्ये सामील होण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याला मोठ्या फीचे आश्वासन देखील दिलं होतं.

पण, लकी बिश्त यांनी बिग बॉस 18 शोमध्ये जाण्यास नकार दिला.लकी बिश्त हे माजी रॉ एजंट आहेत. यासोबत लकी बिश्त यांचं नाव जगप्रसिद्ध स्निपरच्या यादीत आहे. ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये सामील होते. ते एक माजी RAW एजंटह आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी गुप्तता राखणं खूप महत्वाचं आहे. याचं कारणामुळे लकी बिश्त यांनी बिग बॉस 18 ची ऑफर नाकारल्याचं सांगितलं.