गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढली असून अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला आहे.यामुळे कडाक्याच्या थंडीची तीव्रता आणखी कमी होणार आहे. आता कुठे राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली होती आणि असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 27 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्र अन मराठवाडा या विभागात पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आयएमडीने दिला आहे. 27 नोव्हेंबर पासून ते पुढील चार दिवस म्हणजेच 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.महाराष्ट्रात आजपासून पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. तसेच कडाक्याची थंडी देखील अशीच सुरू राहणार आहे. मात्र 27 नोव्हेंबर नंतर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव , लातुर , कोल्हापुर , सांगली , सातारा , पुणे , अहमदनगर , नांदेड , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहील आणि झालाच तर अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे.यामुळे या संबंधित नऊ जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण देखील कमी होणार आहे. या सदर नऊ जिल्ह्यांमध्ये या काळात थंडीची तीव्रता कमी होईल असे IMD ने सांगितले आहे.