कांदा ग्राहकांना रडवणार! ईदपूर्वी दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी  समोर आली आहे. कांद्याच्या मागणीत (Onion Demand) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं दरातही वाढ (Onion Price) झाली आहे. याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. तर दुसरीकडं दरात वाढ झाल्यामुळं ग्राहकांना फटक बसत आहे. बकरी ईदचा सण जवळ आला आहे. त्यापूर्वी कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

15 दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या दरात 50 टक्क्यांची वाढ 

सध्या कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर घसरत होते. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. आता मात्र कांद्याचे दर वाढत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या भावात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरात 12 रुपयांची वाढ झाली आहे.