गेल्या तीन दिवसांच्या उतरणीला सोन्याने ब्रेक दिला. सोन्याचा भाव वधारला. ग्राहकांच्या खिशावर त्यामुळे ताण येणार आहे. चांदीच्या किंमतीत मंगळवारी वाढ झाली होती. त्यात आता घसरण झाली आहे. चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीमुळे चांदी 90 हजारांच्या खाली उतरली आहे. ग्राहकांना चांदीत गुंतवणूक करण्याची संधी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत मोठा बदल दिसला नाही.
आता सोने महागले तर चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते. 8 जून रोजी किंमती उतरल्यानंतर त्यात बदल झाला नव्हता. आता सोने वधारले आहे. त्यानंतर किंमतीत कोणताच बदल झाला नाही. 11 जून रोजी सोने 170 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.गेल्या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची उसळी घेतली.
पण 8 जून रोजी चांदी 4500 रुपयांनी दणकन आपटली होती. त्यानंतर 10 जून रोजी चांदीत200 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 11 जून रोजी चांदी 1200 रुपयांनी घसरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये आहे.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,445 रुपये, 23 कॅरेट 71,159 रुपये, 22 कॅरेट सोने 65,444 रुपये झाले. 18 कॅरेट 53,584 रुपये, 14 कॅरेट सोने 41,795 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,708 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.