डोंबिवलीमधील पलावा पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या पुलाच्या कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले.मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संथ कामाबाबत नोंद झाल्याचा टोला मारत अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील शीळ रोड परिसरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र, शिवसेना मनसे युतीआधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहे. डोंबिवलीत पलावा पुलासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. पलावा पुलाच्या कामावरून शिवसेना आणि मनसेकडून एकत्र आंदोलन करण्यात आले.
युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र
