खासदार प्रणिती शिंदेकडून वाढल्या अपेक्षा…..

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून (Mohol Assembly Constituency) ना भूतो न भविष्यती असे 65 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने मतदार संघातील नागरिकांच्या खासदार शिंदेंकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) केंद्रबिंदू व राज्याच्या नकाशावरील तालुका म्हणून मोहोळचा परिचय आहे. उजनी कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजना या पाणी स्त्रोतामुळे तालुक्यात द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, केळी या फळबागांचे क्षेत्र वधारले आहे. शेतकरी चांगल्या प्रतीचा माल उत्पादित करू शकतो.

मात्र, त्यावर होणारा कृषी प्रक्रिया उद्योग नसल्याने मोत्या सारखा माल मातीमोल दराने विकावा लागतो, त्यामुळे तालुक्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे, तरच शेतकरी टिकणार आहे. येत्या पाच वर्षाच्या कालावधीत अपेक्षापूर्ती होईल का? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.