महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली!

इचलकरंजी येथील आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अकरा महिन्यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेचे दुसरे उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी ११ महिन्याच्या अल्प कालावधीत अनेक कामे मार्गी लावली. कृष्णा जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ही त्यांच्या कार्यकाळातच झाला तसेच मोठ्या तळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम ही त्यांनी मोठ्या विविध युद्ध पातळीवर सुरू केले आहे.अशातच त्यांची बदली करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्रीमती पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संदर्भातील आदेश नगररचना विभागाने आज बुधवारी काढला आहे. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या जागी श्रीमती पाटील पदभार स्वीकारतील. दिवटे यांची तडकाफडकी बदली केल्याने शहरांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. दिवटे यांच्या बदलीला राजकीय कंगोरे असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.आज १२ जून रोजी काढण्यात आलेल्या बदली आदेशात त्यांची कोठे नियुक्ती करण्यात आली. याची कोणतीही माहिती नाही. मात्र त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत.