टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये साखळी फेरीचा टप्पा येत्या मंगळवारी संपणार आहे. त्यानंतर बुधवारपासून ‘सुपर आठ’ फेरीचा थरार रंगणार आहे.बांगलादेशने शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळ संघाचा २१ धावांनी पराभव केला आहे.
हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. दरम्यान, नेदरलँड्सच्या आशा पल्लवित झाल्या असून तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.भारतीय संघ २० जून रोजी ‘सुपर आठ’ फेरीचा पहिला सामना खेळणार आहे.
या लढतीत भारताला अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे, तसेच टीम इंडियासमोर २२ जून रोजी बांगलादेशचे आव्हान असणार आहे. अखेर २४ जून रोजी बलाढ्य संघ ऑस्ट्रेलिया भारताशी दोन हात करील.
‘सुपर आठ’ फेरीची गटवारी
गट एक – भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश
गट दोन – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अमेरिका
‘सुपर आठ’ फेरीचे वेळापत्रक
१९ जून – दक्षिण आफ्रिका वि. अमेरिका, रात्री आठ वाजता, अँटिग्वा
२० जून – इंग्लंड – वेस्ट इंडीज, पहाटे सहा वाजता, सेंट लुशिया
२० जून – अफगाणिस्तान – भारत, रात्री आठ वाजता, ब्रिजटाऊन
२१ जून – ऑस्ट्रेलिया – बांगलादेश, पहाटे सहा वाजता, अँटिग्वा
२१ जून – इंग्लंड – दक्षिण आफ्रिका, रात्री आठ वाजता, सेंट लुशिया
२२ जून – वेस्ट इंडीज – अमेरिका, पहाटे सहा वाजता, ब्रिजटाऊन
२२ जून – भारत – बांगलादेश, रात्री आठ वाजता, अँटिग्वा
२३ जून – अफगाणिस्तान – ऑस्ट्रेलिया, पहाटे सहा वाजता, सेंट विन्सेंट
२३ जून – इंग्लंड – अमेरिका, रात्री आठ वाजता, ब्रिजटाऊन
२४ जून – वेस्ट इंडीज – दक्षिण आफ्रिका, पहाटे सहा वाजता, अँटिग्वा
२४ जून – भारत – ऑस्ट्रेलिया, रात्री आठ वाजता, सेंट लुशिया
२५ जून – अफगाणिस्तान – बांगलादेश, पहाटे सहा वाजता, सेंट विन्सेंट