Javed Akhtar : ‘शमी साहेब त्या कट्टर, मुर्खांची तुम्ही…’ रोजाच्या मुद्यावरुन जावेद अख्तर म्हणाले की…

भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनल सामना खेळला गेला. त्यावेळी मोहम्मद शमीचा मैदानावरील एक असा फोटो समोर आला की, त्यावरुन आता वाद निर्माण झालाय. मॅच दरम्यान मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पीत होता. ते पाहून काही लोकांनी त्याच्या रोजा न ठेवण्यावर प्रश्न उपस्थित केलेत. अनेक जण शमीच्या समर्थनार्थ सुद्धा समोर आलेत. यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर सुद्धा आहेत. त्यांनी मोहम्मद शमीच समर्थन केलय.

सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर जावेद अख्तर यांनी एक पोस्ट केलीय. “ज्यांना रणरणत्या उन्हात तुमच्या पाणी पिण्यामुळे अडचण आहे, शमी साहेब त्या कट्टर, मुर्खांची पर्वा करु नका. या सगळ्या त्यांच्या मतलबाच्या गोष्टी आहेत. तुम्ही महान खेळाडू आहात. आम्हाला सर्वांना तुमचा अभिमान आहे. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा” असं जावेद अख्तर यांनी त्या पोस्टलमध्ये लिहिलय.

‘तर तो गुन्हेगार आहे’

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी मोहम्मद शमीने रोजा न ठेवल्याबद्दल त्याच्यावर टीका केली होती. “इस्लाममध्ये रोजा ठेवणं कर्तव्य आहे. अशावेळी जर कोणी जाणूनबुजून रोजा सोडत असेल, तर तो गुन्हेगार आहे. मोहम्मद शमीने रोजा न ठेवून गुन्हा केला आहे. त्याने असं करायला नको होतं” अशी टीका मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी केली.

विराट बद्दल जावेद अख्तर काय म्हणाले?

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर जावेद अख्तर यांनी विराट कोहलीच सुद्धा कौतुक केलं. विराट कोहली या मॅचमध्ये 84 धावांची शानदार इनिंग खेळला. “विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो आजच्या घडीला टीम इंडियााच मजबूत आधारस्तंभ आहे. माझा सलाम” असं जावेद अख्तर यांनी आपल्या सोशल माीडिया पोस्टमध्ये लिहिलं.

हाय जोश

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आतापर्यंत खूपच रोमांचक ठरली आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडिया फायनल खेळण्यासाठी सज्ज आहे. 9 मार्च म्हणजे रविवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या मॅचसाठी सगळ्यांचाच जोश हाय आहे.