लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत प्रचंड वाद झाले. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केल्यामुळे सांगलीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाला काहीच मदत केली नाही. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
या निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला. यावरु ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. आता विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार गटाला इशारा दिला आहे.
त्यामुळे सांगलीतल्या हालचालींमुळे महाविकास आघाडीत भूकंप येऊ शकतो. तसं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी परिणाम पडतील. आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल मग काहीही लागू शकतील. तसेच या घडामोडींचं केंद्रबिंदू हे सांगली ठरेल.