इचलकरंजीतील भुयारी गटारीचा प्रश्न अखेरीस सुटणार आहे. सरकारच्या भुयारी गटार योजनेला मंजूरी देण्याच्या या निर्णयामुळे इचलकरंजीसह वाढीव भागातील समस्या कायमस्वरुपी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु हे काम न्यायप्रविष्ठ झालेने ते बंद पडले होते. इचलकरंजी शहराला भुयारी गटार योजनेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. भुयारी गटार योजनेचा मूळ प्रस्ताव हा २५५ कोटी रुपयांचा होता.
त्यामध्ये असलेल्या काही त्रुटी दूर करुन या योजनेत इचलकरंजी महापालिका हद्दीत समाविष्ट वाढीव भागातही ही योजना राबविण्यात यावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे हे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्नशील होते. त्या पाठपुराव्याला यश मिळून या संदर्भात मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार प्रकाश आवाडे उपस्थित होते.