पीएम किसानचा 17 वा हप्ता मिळाला नाही ? अशी करा ऑनलाईन तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधानांनी 18 जून रोजी वाराणसीमधील एका कार्यक्रमात या योजनेतंर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा केले आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झाला आहे, त्यांना एसएमएसद्वारे त्याची माहिती मिळाली आहे. जर तुमच्या खात्यात 17 व्या हप्त्यातंर्गत 2000 रुपये आले नसतील तर तक्रार करता येते. शेतकरी ऑनलाईन सुद्धा त्याची तक्रार नोंदवू शकतो.

pmkisan-ict@gov.in या मेलवर त्याला विहित माहिती देऊन तक्रार नोंदविता येते.या व्यतिरिक्त शेतकरी, किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 वा टोल फ्री क्रमांक 1800115526 वर कॉल करु शकतो. 011-23381092 या क्रमांकावर कॉल करुन तक्रार नोंदवू शकतो.हप्त्याचे स्टेट्स चेक करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर क्लिक करता येईल. लाभार्थ्यांचे स्टेट्सवर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. याठिकाणी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळेल.

2019 सालापर्यंत ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर जर तुमच्या नावावर जमीन झाली असेल. तर या योजनेचाचा लाभ मिळत नव्हता. पण तो लॉक- इन पिरिअर आता हटवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.