बटाटा, कांदा, टोमॅटोनंतर आता डाळींच्या दरातही वाढ

 चालू जून महिन्यात अनेक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे (Potato), कांदा (onion), टोमॅटोनंतर (Tomato) डाळींचे (Dal) भाव देखील वाढले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या किंमतीत 11 टक्क्यांहून वाढ झालीय. त्याचबरोबर तूर आणि उडदाच्या दरातही 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. 

जून महिन्यात डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. जून महिन्यात बटाटे, कांदा, टोमॅटोसह डाळींच्या दरात वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत हरभरा डाळीच्या दरात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या भावात 67 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तूर, उडीद, मूग यांच्या दरात वाढ झाली आहे. देशातील बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या सरासरी दरांवर नजर टाकली तर सर्वाधिक वाढ टोमॅटोमध्ये झाली आहे. टोमॅटोच्या दरात 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर हरभरा आणि तुरीच्या दरात देखील सरासरी 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.