सबसे कातिल गौतमी पाटील चा विषयच वेगळा आहे. तिच्यासाठी लोक अक्षरशः वेडे आहेत. तिची क्रेझ एवढी आहे की तिची एक झलक पाहण्याठी लोक काहीही करण्यासाठी तयार आहेत. फक्त तरुण, पुरुषच नाहीतर लहानगे आणि महिलाही गौतमीचे फॅन आहेत.
गौतमी सतत लाइफलाइटमध्ये असते. अशातच गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी तिनं फिल्ल राडा घातलाय. गौतमीने अभिनेता अमय वाघला किस केलं. तुम्ही तिचा लेटेस्ट व्हिडीओ पाहिला का?गौतमी पाटील आणि मराठी अभिनेता अमेय वाघचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.
हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून या गाण्याचं नाव ‘लिंबू फिरवंल’ आहे. ‘तिच्या डोळ्यात जादू काळी, ती मंतर फुंकरणार..ती आलीये, आता सगळ्यांवर लिंबू फिरवणार..’ असे गाण्याचे बोल असून रिलीज होताच सोशल मीडियावर गाण्याची चर्चा सुरु झाली.’लाईक आणि सबस्क्राईब’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं आहे. यामध्ये गौतमी पाटील अमेय वाघसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
या नव्या गाण्यात गौतमीची हटके स्टाइल लोकांना पहायला मिळत आहे. या गाण्यात गौतमीने अमेय वाघच्या गालावर किस केलं आहे. तिच्या या किसने प्रेक्षकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.दरम्यान, 18 ऑक्टोबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटात काय खास असणार आणि गौतमी आणि अमेयची फ्रेश जोडी, त्यांचं गाणं पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक, चाहते उत्सुक आहेत. मराठी सिनेमात गौतमी पहिल्यांदा एक आयटम साँग करताना दिसणार आहे. या सिनेमात अमेय वाघबरोबरच अभिनेत्री जुई भागवत आणि अमृता खानविलकर हे कलाकारही प्रमुख भुमिकेत आहेत.