पुष्कर श्रोत्री यांनी विलेपार्ले पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर मोलकरीण उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विलेपार्ले पूर्वेला राहत असून त्यांच्याघरी घरकामासाठी आणि वडीलांची काळजी घेण्यासाठी तीन कामगार होते.
यामध्ये उषा गांगुर्डे (वय ४१) अहिल्या आणि अक्षता नावाच्या या महिला होत्या. यामधील उषा ही महिला अभिनेत्याच्या घरी सुमारे ५ ते ६ महिन्यापासून करीत होती. पुष्कर यांनी आपल्या वडिलांना १५ ऑगस्ट रोजी १ लाख २० हजार रुपये इतकी रोकड दिली होती. कामानिमित्त पुष्कर श्रोत्री १७ ऑगस्टला अमेरिकेमध्ये गेले आणि २० सप्टेंबरला भारतात परतले.
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री याच्या घरामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लाखो रुपयांचे दागिने आणि काही रोकड चोरट्याने लंपास केली आहे. केअरटेकरनेच ही चोरी केल्याचा आरोप पुष्कर श्रोत्री यांनी केला आहे. या प्रकरणी विलेपार्ल पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरी परतल्यानंतर पुष्करने आपल्या वडिलांचे कपाट तपासले. त्यावेळी अभिनेत्याने वडिलांना दिलेले पैसे सापडले नाही. त्यासोबतच त्यांचे बेडरुममध्ये असलेले पाकिटही सापडत नव्हते. त्यामध्ये वेगवेगळे विदेशी चलनही होते. त्यावेळी अभिनेत्याला आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचा संशय आला.
त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी केअरटेकर उषाला ताब्यात घेत तिची चौकशी केली. चौकशीत आपणच चोरी केल्याची तिने कबुली दिली. चोरलेल्या परदेशी चलनाचे विनिमय करुन त्या बदल्यात ६० हजार रुपये रक्कम प्राप्त केल्याचे उघड झाले आहे.