शेअर बाजारात असे असंख्या स्टॉक्स आहेत ज्यांनी लोकांना भरभरून रिटर्न्स दिले. तुम्हीपण मार्केटमधून कमाई करू इच्छित आहात तर ही बातमी तुमचं कामाची आहे. बाजरात तुम्ही योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बंपर रिटर्न मिळण्याची खात्री आहे. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक शेअर ग्लास बनवणाऱ्या कंपनीचा आहे ज्याने गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक
शेअर बाजारातील गुंतवणूक चढउताराच्या अधीन आहे, परंतु जर तुम्ही योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला नक्कीच बंपर रिटर्न्स मिळतील. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या काही दिवसात गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारा असाच एक शेअर म्हणजे ग्लास कंपनी बोरोसिल रिन्युएबल्सचा आहे ज्याने गुंतवणूकदारांना तीन लाख टक्क्यांहून अधिक बंपर परतावा दिला आहे.
सोलर ग्लास मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअरने १३ पैशांवरून ४०० रुपयांपर्यंत उडी घेतली आहे. अशाप्रकारे या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी ३ लाख टक्क्यांहून अधिक परतावा दिला. ३१ ऑक्टोबर २००३ रोजी म्हणजे २० वर्षांपूर्वी बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स बीएसईवर १३ पैशांवर ट्रेंड करत होते. अशाप्रकारे कधीकाळीचा पेनी स्टॉक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी शेअर्स ४०५.८५ रुपयांवर बंद झाले.
एक लाखांवर ३१ कोटींचा परतावा
बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सनी या कालावधीत ३,१२,००० टक्के परतावा नोंदवला. अशाप्रकारे जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३१ ऑक्टोबर २००३ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि गुंतवणूक कायम ठेवली असेल तर या शेअर्सचे सध्याचे मूल्य ३१.१२ कोटी रुपये झाले असेल. तसेच गेल्या तीन वर्षात बोरोसिल रिन्यूएबल्सच्या गुंतवणूकदारांनी ३४० टक्के नफा कमावला आहे.