राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची २६ जूनला शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त २५ ते ३० जून या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
२५ जून रोजी ‘शाहू विचार जागर’ तालुका ठिकाणी. २६ जून बुधवारी सकाळी आठ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला शाहू जन्मस्थळ येथे पुष्पांजली व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता दसरा चौक येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली व पुष्पहार अर्पण (पोलिस बँड मानवंदना)होणार आहे.
सकाळी १० वाजता सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका येथे वृक्षारोपण तसेच सकाळी १० वाजता शोभायात्रा निघणार आहे. शिवाजी विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांत शाहू विचारांवर आधारित १५० व्याख्याने होणार आहेत.
२७ जून राजर्षी शाहू हा कार्यक्रम माणगाव येथे होईल.
इचलकरंजीतील डी.के.टी.ई कॉलेज येथे २९ जून रोजी शनिवारी परिसंवाद- आरोग्याचे प्रश्न, तसेच परिसंवाद- वस्त्रोद्योगापुढील आव्हाने हा कार्यक्रम तर ३० जून रोजी महिला बचत गटांचा मेळावा कोल्हापुरात होणार आहे. इचलकरंजी येथे रेल्वे स्टेशन ते शाहू जन्मस्थळ या मार्गावर हेरिटेज वॉक होणार आहे.