मोहरम आजपासून पीर प्रतिष्ठापना होणार…..

कोल्हापुरातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्रित येऊन सण साजरा करण्याची प्रदीर्घ परंपरा असलेला मोहरम सण आज, सोमवारपासून सुरू होत असून कोल्हापूर शहर परिसरात त्याची तयारी सुरू झाली आहे. मोहरम सण साजरा करण्याची कोल्हापूरची मोठी परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्रितपणे हा सण साजरा करतात. मोहरमच्या पहिल्या दिवसापासून शहराच्या विविध भागात पंजे, पीर यांची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

त्याची सुरुवात आज सोमवारपासून होईल. काही ठिकाणी रविवारी रात्री कुदळ मारण्याचा विधी पार पडला.शहरातील जुन्या पेठातून विविध तालमीत पंजे बसविले जातात. काही घरातूनही पंजे बसविले जातात. अत्यंत धार्मिक तसेच पवित्र वातावरणात मोहरम साजरा केला जातो. पोलिस स्थानकनिहाय शांतता कमिटीच्या बैठका घेऊन मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.