क्रिकेट जगतातील सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली सध्या क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रमांमध्ये आघाडीवर आहे पण आता फक्त क्रिकेटचं नाही तर जाहिरात जगतातही विराटने अव्वल स्थान पटकावलं आहे.याबरोबरच विराटने सगळ्यात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या सेलिब्रिटीजच्या यादीतही पहिलं स्थान पटकावलं आहे. या यादीत विराटने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि रणवीर सिंहला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.
भारतातील सगळ्यात महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत आपला स्थान वाढवत, कोहलीने वर्षभरात त्याच्या एकूण ब्रँड मूल्यामध्ये सुमारे 29 टक्क्यांनी वाढ केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 सीजन कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) मधील सहभाग प्रभावी होता. या लीगमध्ये प्रतिष्ठित ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार T20 विश्वचषक स्पर्धेत सामील झाला आहे. कोहलीने गेल्या वर्षी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विश्वचषक फलंदाजी यादीतही वर्चस्व गाजवलं. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 35 वर्षीय खेळाडूने फलंदाजीतील अनेक विक्रम मोडीत काढले.
या बॅटिंग आयकॉनने ICC ODI Player of the Year चा पुरस्कार जिंकला आणि ICC Men’s ODI Team of the Year साठी देखील विराटची निवड झाली. क्रोल या कॅन्सल्टंसी फर्मच्या रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २२७.९ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे तर अभिनेता रणवीर सिंहची ब्रँड व्हॅल्यू २०३.१ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे.
तर किंग खान शाहरुखने १२०.७ मिलियन यूएस डी डॉलर कमवत या यादीत तिसरं स्थान पक्कं केआहे. यात धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचीही नावं आहेत. एम एस धोनीची सध्या ब्रँड व्हॅल्यू ९५.८ मिलियन यूएस डॉलर असून सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू ९१.३ मिलियन यूएस डॉलर इतकी आहे.